• कार्यालयीन वेळ – सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते रात्री ७ वा.
 • ज्योतिष सल्ला

  घराच्या चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा असतात.

  त्यापैकी उत्तर, ईशान्य आणि पूर्व दिशेला जास्तीत जास्त उतार असावा, पाणी असावे, खिडक्या, दरवाजे हे असल्यास अत्यंत शुभ फलदायी ती वास्तू असते. त्याचविरुद्ध दक्षिण, नैऋत्य आणि पश्चिम दिशेला कमीतकमी खिडक्या असाव्यात,जास्तीतजास्त चढ असावा, उतार अजिबात नको, पाणी अजिबात नको चुकीच्या अशा वास्तूच्या प्लॅनमधे किंवा त्या घरामध्ये त्या लोकांना जरा जास्तच संघर्ष करावा लागतो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुध्दा जास्तच संघर्ष असतो, त्यामधे लोक धार्मिक वृत्तीची नसतात.

  घराचा दरवाजा हा दक्षिण दिशेला नसावा ,हा चुकीचा एक गैरसमज आपल्या वास्तुप्रेमींमध्ये पसरलेला आहे.

  घराचा दरवाजा कुठे असावा, याबद्दल जर कधी आपण चर्चा केली तर त्यामधे उदाहरणार्थ चौकोणी किंवा आयताकृती जे घर आहे त्या घराच्या मधोमध केंद्रबिंदू ठेवून चार भाग त्याचे करायचे त्या चार भागांमध्ये केंद्रबिंदु म्हणजे ब्राम्हस्थानावर उभे राहिल्यानंतर कुठल्याही दिशेला तोंड केले तर त्या रेषेच्या समांतर डाव्या हाताला तीन फुटापर्यंत आपण दरवाजा काढू शकतो.

  पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या कुठल्याही दिशेला तो दरवाजा चालू शकतो फक्त तो दरवाजा हा, महाद्वार हे मोठे असावे,लाकडाचे असावे. त्याला उंबरा व्यवस्थित सागवानी किंवा जे पंचपल्लव झाडे आहेत.

  वड, आंबा, पिंपळ, औदुंबर या झाडांचा उंबरा असल्यास अतिशय फलदायी त्याचे अनुभव येतात. दरवाजाच्या समोर द्वारवेध म्हणजे अगदी समोरच झाड नसावे, तरच तो दरवाजा आपल्याला अत्यंत लाभकारक असा असतो.

  शक्यतो घरात आरसा हा पूर्व आणि उत्तर दिशेलाच असावा. कारण ज्या ठिकाणी आरसा असतो ती दिशा तो वाढवतो.

  तसेच आरसा लावताना त्या आरश्यात नेमके कुठले चित्र दिसते आहे हे बघावे, त्याच्यामध्ये जर कधी समोर असलेला दोष दिसतो आहे तर तो डबल दोष होतो आणि चुकीचा आपल्याला रिझल्ट मिळायला सुरुवात होते.

  अशाठिकाणी आरसा लावताना योग्य ती काळजी घेवून, योग्य वास्तुतज्ज्ञांकडूनच आरसा लावावा,

  आरसा लावल्यानंतर अतिशय उत्तम अशी फलित मिळालेली आपण बऱ्याच ठिकाणी बघितलेले आहे

  बेडच्या समोरच उठल्याबरोबरच आरसा दिसेल अशी व्यवस्था घरामध्ये कधीही नसावी आणि समजा उत्तर, पूर्व आणि ईशान्य दिशेला आरसा लावायची जागा नसेल तर दक्षिण किंवा पश्चिमेला आरसा लावावा लागला तर उपयोग नसतांना त्या आरशावर त्या दिशेच्या कलरचा पडदा हा लावण्यात यावा, म्हणजे दोष आपल्याला कमीतकमी लागतील.

  आजकालच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये उंबरठा हा नाहीसाच झालेला आहे.

  पूर्वीच्या काळी अर्धा ते एक एक फुटाचे उंबरठे लांब लांब सडक असे उंबरठे असायचे त्यावेळेस त्या लोकांकडे आरोग्य, धनसंपत्ती, समाधान, शांतता तितक्याच प्रमाणात असायची.

  परंतु आजकालच्या संस्कृतीमध्ये हे सगळं आपण नाहीसे केलेले आहे.

  अजिबात कुणाला शांतता मिळत नाही. तर प्रत्येक घराला छोटा का होईना परंतु लाकडाचा उंबरठा असावाच,  त्याच्या खाली तांब्याची उंबरापट्टी आणि पाच रत्न त्या दिशेप्रमाणे टाकायचे आहेत. विलक्षण असे अनुभव अतिशय चमत्कारिक अनुभव आपणांस पाहण्यास मिळतील.

  आपल्यावर येणारे संकट, आजारपण किंवा पैश्यांची हानी ही उंबरठा लावल्यानंतर दोन ते तीन महिन्यात आपल्याला जाणवेल की बऱ्यापैकी हे सगळं वातावरण शांत झालेलं आहे.

  संसारी जीवनासाठी आपल्याला जे आवश्यक आहे ते मिळण्यास सुरुवात झालेली आहे.

  योग्य मुहूर्तावर आपण योग्य रित्या वैदीक उंबरा लावल्यास अतिशय उत्तम आपल्याला परिणाम पाहण्यास मिळतात.

  आता बऱ्याच लोकांना या गोष्टीमध्ये अंधश्रद्धा वाटते की नजर वगैरे काही लागत नाही किंवा निगेटिव्ह एनर्जी असला काही भाग नसतो. साधे सिम्पल इलेक्ट्रीक बोर्डामध्ये सुद्धा प्लस मायनस हे दोन पॉईंट आपण नेहमी बघत असतो. आपण जो साधा सेल जो घड्याळात लावतो तो सेल जरी बघितला तरीसुध्दा त्याच्यामधे प्लस मायनस हा विषय असतोच. स्त्री आणि पुरुष हे सुध्दा प्लस मायनसचेच एक प्रतीक आहे. दिवस आणि रात्र सुध्दा प्लस आणि मायनसचेच एक प्रतीक आहे. मायनस नसेल तर प्लसची व्हॅल्यूच नाही आणि प्लस नसेल तर मायनसची व्हॅल्यू नाही.

  कुठल्याही दोन गोष्टी या, ह्या भूतलावर असतातच. त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी ही असतेच जसे की एखादया गर्दीच्या ठिकाणाहून एखादे लहान मूल आल्यानंतर ते खूप रडते,तर त्यांच्यावरून आपण एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकून जर कधी ते सात वेळा आपण त्यांच्यावरून फिरविले म्हणजे घड्याळासारखे तर ते पाचव्या मिनिटाला शांत होते. याचा अर्थ त्याच्यावर ती निगेटिव्ह एनर्जी त्याला सहन न झालेली त्याच्यावर ती आलेली आहे त्यामुळे हा असला प्रकार घडतो.

  नजर काढणे म्हणजे काय तर आपण एखाद्या उग्र वस्तूने त्यांचा ओरा शुध्दीकरण करतो, तशी नजर लहान आणि मोठया मुलांना, स्त्रियांना, माणसांना कुणालाही लागू शकते. तसेच ही नजर काढण्यासाठी बरेचजण वेगवेगळे उपाय करतात. त्याच्यामध्ये मीठ, मोहरी, नारळ, लिंबू किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात, तर त्याने आपण आपला ओरा शुद्ध करायचा आहे. घरामध्ये आपल्याला निश्चितच शांतता त्याच्याने प्राप्त होईल, मानणे न मानणे हा प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय आहे. परंतु जेव्हा सगळे उपाय करून जेव्हा मनुष्य थकतो तेव्हा हा एखादा उपाय आपणांस निश्चितच
  फलदायी हा ठरतो.

  एक नाडी दोष असल्यास मुलं होत नाही किंवा त्याला पर्याय म्हणून रक्तगट वेगळा असेल तर विवाह करण्यास हरकत नाही. अशा चुकीच्या अफवा आपल्या जोतिषशास्त्राला बदनाम करण्यासाठी काही लोक पसरवित आहेत. तर नाडी म्हणजे आपले वात, पित्त, कफ ही प्रकृती तर त्या एकच प्रकृतीची लोक एकत्र आले तर त्यांचे आरोग्य योग्य पद्धतीने चालत नाही. संसाराची गाडी आपल्याला जेव्हा चालवायची असते. दोघेही एकत्र आजारी पडले तर संसाराकडे लक्ष द्यायचे कुणी ,त्यासाठी एका नाडीचे लोक लग्न करत नाही. अठरा पेक्षा जास्त गुण असतील. त्यावेळेस ही सुद्धा गोष्ट मान्य केलेली आहे की चालत असं. रक्तगटाचा आणि नाडीचा काहीही संबंध नाही.

  वात, कफ, पित्त म्हणजे आद्य, मध्य आणि अंत्य ही नाडी होय.

  रामराज्यात राहून कैकई सुधरली नाही आणि रावणाच्या राज्यात राहून विभीषण बिघडला नाही.
  सगळ्याच गोष्टी संगतीने आणि सांगितल्याने होत नाहीत.
  तर होतात अनुभवाने,
  ज्याला त्याला प्रत्येकाला अनुभव येवू द्या, अनुभवातून तो शिकेल,  तरच सुधरेल,
  आपण बोलून बिघडवू नका.
  कोणाला सुधरवण्यासाठी तुमचा जन्म झालेला नसून स्वतःला सुधरवण्यासाठी स्वतःचे उद्देश पूर्ण करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे, फक्त बघत रहा.
  या कृत्यानेच उत्तम शांतता घरात नांदेल.

  मुलं का ऐकत नाही आणि मुलांनी ऐकावं असं पालकांना का वाटतं ?

  त्याचं मुख्य कारण आहे की समाजात मुलांना चांगले स्थान यश, कीर्ती प्रसिद्धी मिळावी यासाठी, परंतु पुस्तक वाचून गाडी चालवता येत नाही. पुस्तक वाचून पाण्यात सुद्धा पोहता येत नाही त्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागते म्हणजे अनुभव घ्यावा लागतो आणि प्रत्येक गोष्ट मुलांना आपण सांगत आहोत. आपण जगात येण्याचे फक्त माध्यम आहोत पालकांनी हे समजून घ्यावे. त्यांच्यापेक्षा वीस ते पंचवीस वर्षे फक्त आपण आधी या जगात आलो आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त कळते आणि मुलांना काही कळत नाही असे काही नाही.

  आजचे हे एकविसावे शतक आहे, कॉम्पुटरयुग आहे त्यामुळे आपल्यापेक्षा जास्त पुढच्या पिढीला नक्कीच कळणार आहे, अनुभव येणार आहे फक्त त्यांचे विचार आणि भावना तिथे मांडता येत नाही आणि कुठे तरी आपण हक्क दाखवायला जातो म्हणून मुलं ऐकत नाही. जर कधी त्यांचे निर्णय त्यांना घेवू दिले ,दहा वेळा पडतील पण अकराव्या वेळेस अतिशय सुंदर आणि कदाचित तुमच्या पेक्षाही सुंदर ते कृती करतील.

  आजकाल मुलं आईवडिलांना नको असलेल्या जातीबरोबर, आवडत नसलेल्या मुलामुलींबरोबर अफेअर करतात हे जेव्हा आईवडिलांना कळते तेव्हा ते तीव्र विरोध करतात,व त्यामुळे विरोध होणाऱ्या गोष्टीं कडेच मुलांची इच्छाशक्ती जास्त वाढवून टाकतात, विरोध होतो तीच गोष्ट मुलांना जास्त करायला आवडते कारण की त्यांच्या आयुष्यात जी मुलं वयात आलेली आहे हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला असतो आईवडिलांनी समजूतदारपणे याच्यातून मार्ग काढला पाहिजे परंतु आईवडील तसे न करता त्यांना नाहीचा पाढा लावतात. हे करू नका, ते करू नका, असे करू नका, तसे करू नका आणि सगळ्यात जास्त धोका शारीरिक आणि मानसिक त्याच ठिकाणी असतो. गाडी चालविताना आपण वळणावर जेव्हा असतो तेव्हा गाडी चालविण्याकडे विशेष लक्ष देतो तर आयुष्याच्या इतक्या मुख्य वळणावर शारीरिक सुख काय असते, मानसिक सुख काय असते आपल्यासारख्याच योग्य जोडीदाराबरोबर विवाह केल्यास काय फरक पडतो हे त्यांना स्वतःचे स्वतःलाच समजू द्या. जर कधी त्यांना विरोध केला तर मुद्दाम ते तेच करतील त्यामुळे त्यांच्याकडून मोबाईल हिसकावून घेवू नका, त्यांच्या फिरण्यावर त्यांना बंधनं घालू नका त्यांना त्याच्यातून कळू द्या. उलट त्याचे काय साईड इफेक्ट आहेत ते त्यांना पटवून द्या, ते त्यांना समजावून द्या. तुम्ही जर कधी हे नातं मित्रासारखे त्यांना समजावून सांगितले, पाहिजे त्या व्यक्तीशी फोनवर बोलू दिले, बाहेर फिरू दिले आणि नंतर त्याचे त्यांना दुष्परिणाम समजावून सांगितले तर ते मित्रासारखे तुम्हाला सर्व सांगतील.

  लहानपणी मुलं आपल्याला नकळत सगळं सांगतात, पण आपण त्याने काही चुकल्यानंतर जेव्हा रागावतो, तेव्हा मग ते आपल्याला सांगायचे बंद करतात, आपल्याला वाटते आपली मुलं सुधारली परंतु ते सुधरत नसतात. आपल्यामागे ते सगळं करत असतात. त्यामुळे मुलांशी मैत्रीपूर्ण नाते आपण निर्माण करावे.

  ज्या घरामध्ये दक्षिण दिशेस पाण्याचा नळ तसेच नळ लिकीज असणे किंवा घरामध्ये भिंतीतून पाणी येणे, भिंतीतून लिकीज असणे अशा समस्या असतात .त्या घरामध्ये लक्ष्मी अस्थिरतेचे खूप केसेस आपण बघितले असतील, त्याला उपाय म्हणजे ते लिकीज मुळासकट काढणे, सर्व नळ बदलून घेणे हे सर्वकेल्यानंतर, निश्चितच प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या माणसाच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो.

  जर कधी पूर्व दिशेला घड्याळ लावलेले नसेल आणि घरात इतर ठिकाणी घड्याळ लावलेले असेल व सर्वांची वेळ वेगवेगळी असेल. तर घरात वादविवाद होतात आणि एकमत कधीही होत नाही त्यामुळे सेकंद काट्यासह घरातील सर्व घड्याळांची वेळ एक करावी तसेच घरामध्ये इलेक्ट्रीक उपकरणे कुठलीही बंद आणि बिघडलेली नकोत, जी उपयोगात आहे ती ठेवावी नाहीतर सरळ काढून टाकावी. कॅलेंडर आणि घड्याळ पूर्वेच्या भिंतीवरच असावे त्याने घरामध्ये लवकर एखाद्या विषयावर एकमत होते आणि शांतता लाभते.

  • शक्यतो सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देवू नये.
  • दिवा लावण्याच्या वेळेस म्हणजे साधारण साडे सहा ते सात सूर्योदयाच्या आसपास जेवायला बसू नये.
  • संध्याकाळी कचरा काढू नये.
  • कोणाचाही एकही रुपया डुबवू नये
  • नेहमी खरे बोलावे
  • नेहमी दात घासावे
  • जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत पती-पत्नीनी समागम करू नये
  • घरात आल्यानंतर दिवसभरात कमविलेली जी लक्ष्मी आहे ती देवापुढे ठेवावी आणि मी ही प्रामाणिकपणे कमविलेली आहे हे परमेश्वराला वचन द्यावे आणि मगच दुसऱ्या दिवसापासून ते पैसे खर्च करण्यास घ्यावे.

  असा प्रश्न आपल्याला पडल्यास काही लोकांचे मत चालते आणि काही लोकांचे मत नाही चालत, असा सोयीस्कर अर्थ लोकं काढतात.
  कारण बेडरूममध्ये पती-पत्नी संबंध तसेच बायकांची मासिक पाळीचे धर्म असतात त्यामुळे बेडरूममध्ये देवघर चालत नाही असा चुकीचा गैरसमज लोकांचा आहे. परंतु पती-पत्नींचे संबंध हा शिव-पार्वतीचाच एक भाग आहे त्यामुळे देवघर बेडरूममध्ये असेल तर 100℅ चालते. तसेच, स्त्रियांची चार दिवसांची पाळी हा एक चांगला भाग आहे ती स्त्री आहे ते मातृत्व आहे यासाठी,त्याच्यातूनच आपल्या सर्वांचा जन्म झालेला आहे त्यामुळे देवतांची प्राणप्रतिष्ठाच अशा पध्दतीने केलेली असते. हे त्यांना हा सर्व भाग चालतो आणि माहीत असतो त्यामुळे चार दिवसांमध्ये पूजा केलेली सुद्धा चालते. तो आपआपल्या मानण्याचा भाग आहे एकत्र कुटुंब पध्दत होती तेव्हा चार-पाच बायका एकत्र होत्या त्यामुळे चार दिवस बायकांना हे सरकारी सुट्टीचे असतात. पूर्वीच्या काळी सर्वच कामं बायकांना करायला लागत असे त्यामुळे हे चार दिवस बायकांनी बाजूला बसावे म्हणजे त्यांना आरामाची खरी आवश्यकता असते परंतु ज्या ठिकाणी फक्त नवरा-बायको आणि त्यांचं एक छोटसं मुल हे अडीच कुटुंब जे आहे त्या ठिकाणी मात्र हे नियम कोणीही पाळू नये ते आपआपल्या मनाप्रमाणे पाळावे मासिक पाळीचा जो बाऊ केलेला आहे तो मनातून दूर करावा, मलमूत्र, घाम, वीर्य, याचप्रमाणे तो एक शरीराचाच एक भाग आहे हे लक्षात घ्यावे.