मानवी जीवनामध्ये असंख्य प्रकारच्या अडचणी येत असतात. त्या आपण आत्मविश्वासाने सोडवतो सुद्धा पण कधी कधी नशीब सुद्धा साथ देत नाही. कधीतरी आत्मविश्वास कमी पडायला लागतो आणि मग त्यावेळेस आपण आपल्या शास्त्रांमध्ये डोकावतो कुठे ना कुठे आपल्याला उत्तर हे मिळतेच पण सगळ्यात जास्त आपल्या प्रश्नांची उत्तरे ही वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रातच मिळत असतात. संसारी माणसाला आजारपण, करिअर, शिक्षण, विवाह, वैवाहिक समस्या, धनप्राप्ती किंवा क्वचित कोर्टासंबंधी हे मुख्य प्रश्न असतात. यातून त्वरित मार्ग निघण्यासाठी निसर्गाने बहाल केलेलं वास्तुशास्त्र आपल्यासाठी उभे आहे. यातून आपण प्रत्येक प्रकारच्या अडचणी सोडवू शकतो शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ या म्हणी प्रमाणे योग्य ठिकाणी आपण युक्ती वापरून आपला वेळ, खर्च होणारा पैसा आणि श्रम आपण वाचवू शकतो .आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांच्या तपश्चर्येतून, अनुभवातून ही शास्त्रे निर्माण केलेली आहेत. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता केवळ आणि केवळच मनुष्य जन्माच्या कल्याणसाठीच ही शास्त्रे आहेत. ही सर्व शास्त्रे कर्म वादाला पूरक अशी आहेत.जो चांगले कर्म करेल त्याला दहापट फलप्राप्ती करून देण्याचे सामर्थ्य या शास्त्रात आहे. असिमीत नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत
पंचमहाभूते ज्याप्रमाणे अखंड ऊर्जेचा झरा आहे त्याचप्रमाणे या नैसर्गिक शक्तींचा उपयोग स्वतःच्या कल्याणासाठी कसा करायचा हे वास्तुशास्त्रात आहे.
भूमी, अग्नी,वायू, आकाश, जल ही पंचमहाभूते परस्पर विरोधी आहेत या पंचमहाभूतांनीच सृष्टी निर्माण झाली आणि हीच पंचमहाभूते आपल्या शरीरात सुद्धा आहेत या पंचमहाभूतांना परस्परविरोधी असून सुद्धा एकत्र ठेवण्याचे काम आपला आत्मा (जीव) हा करत असतो. सर्व काही भौतिक सुख ऐहिक सुख प्राप्त होवून सुद्धा या जीवाची चिंता काही संपत नाही. या जीवाला शांती काही लाभत नाही. सुखाने जगता येत नाही. सुखासमाधानाने, शांततेने जगण्यासाठी वास्तुशास्त्र हा एकमेव पर्याय आहे.
– वास्तुतज्ञ जितेंद्र कुलकर्णी गुरुजी