• कार्यालयीन वेळ – सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते रात्री ७ वा.
  • ज्योतिषशास्त्र

    || ज्योतिषशास्त्र||

    ज्योतिषशास्त्र म्हणजे माझ्या मतानुसार आपल्या शरीरातील आत्मज्योती आणि परमात्मा परम ज्योती यांचे मिलन.

    ही परम ज्योती त्याचा अंश आपल्या शरीरात असणे म्हणजेच ज्योतिष असे होय.अनेक ग्रंथात वेगवेगळे दावे केलेले आहे .त्याला मी सहमत आहे हा माझा स्वानुभव आहे. ज्योतिष कुंडली म्हणजे पृथ्वीच्या अवती भोवती ग्रहसमूह तारकांचा एक पध्दतीचा फोटो म्हणजेच जन्मकुंडली होय. आणि अश्या कुंडलीचे बारा भाव (भाग) त्यात बारा राशी, बारा ग्रह प्रत्येकाच्या 360 कला, विकला, लग्न कुंडली सारख्या सोळा कुंडल्या, महादशा, अंतर्दशा आणि विदिशा या मुख्य दशा म्हणजे 12×12×12×360+16 कुंडल्या + 3 मुख्य दशा इतका सूक्ष्म विचार ज्योतिषशास्त्रात आहे. तसेच गतजन्मीच्या कर्माचा आरसा म्हणजे कुंडली होय .त्या कर्माची फळ भोगण्यासाठी आपला जन्म झालेला असतो. ही फळ मग ती सुखाची असो किंवा दुःखाची असो कधी कुठे कशा स्वरूपात कुठल्या वर्षी, महिन्यात, कुठल्या दिवशी मिळतील हे समजण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा उपयोग होतो.

    जन्म मृत्यू आणि विवाह कोणाचा कधी कुठे कसा होईल हे सांगणे जरा कठीण असते पण शास्त्राचा गाढ अभ्यास केल्यानंतर या प्रश्नांची उत्तरे आपणांस मिळतात. माझ्यामते ज्यावेळेस जे ठरलेल आहे ते त्यावेळी होणार. उपायांनी आणि आपल्या कर्मांनी आलेली अशुभ घटना, अशुभ वेळ, संकट ही पुढे ढकलता येतात आणि त्याची तीव्रताही कमी करता येते आपआपल्या कर्मानुसार मिळणारी चांगली फळं ही कमी जास्त प्रमाणात असू शकतात. त्यात शास्त्राचा काहीही दोष नाही. फक्त योग्य वेळी योग्य ज्योतिष आपणांस मिळायला पाहिजे. म्हणजे आपणांस उत्तम फलप्राप्ती होते. ज्योतिष शास्त्रात सांगितले जाणारे उपाय; शांतीपूजा, व्रतवैकल्ये, मंत्र साधना, जप ,यंत्र साधना, रत्न, रुद्राक्ष, धारण विधी, दान किंवा अन्य कुठलाही उपाय जो ज्योतिषशास्त्रात मोडतो असा कुठलाही उपाय श्रद्धा असेल तर त्यातून आपल्याला 100% फलप्राप्ती होते हे आता सायंटिफिकली प्रूफ झाले आहे आणि ते कसे हे आम्ही आपणांस सिद्ध करून दाखवू शकतो. त्यासाठी थोडावेळ आणि श्रद्धेची आवश्यकता असते.

    – ज्योतिषाचर्य पंडीत जितेंद्र कुलकर्णी गुरुजी.