- वातावरण आणि विचारांची शुद्धी होते.
- कुठल्याही प्रकारची नकारात्मक शक्ती ( भूत प्रेत आदी) घरात प्रवेश न करणे.
- किडे ,मुंगी,मच्छर यांचा घरात प्रवेश कमीतकमी होणे.
- मोबाईल रेडिएशन कमी होतात.
- घरात शांतता निर्माण होते.
- विनाकारण चिडचिड होत नाही.
- घरात नेहमी उत्साह वाटतो.
- अग्निहोत्राच्या भस्माने दात घासले असता दाता संबंधीचे विकार होत नाही.
- अग्निहोत्राच्या भस्माने चोळून अंघोळ केल्यास कनककांती आणि तेज प्राप्त होते.
- अग्निहोत्राच्या भस्माने भांडी घासली असता भांड्यांतून शरीरात येणारे बॅक्टेरिया यांचे प्रमाण कमी होते. भांडी स्वछ निघतात. परंतु हे भस्म वस्त्रगाळ चूर्ण करुन मगच वापरणे.
- उरलेले भस्म खत म्हणून झाडांना टाकणे. मुलांवर चांगले संस्कार होतात.
- अग्निहोत्र करण्यामधे मुलं पुढाकार घेतात, संस्कारी होतात.
- भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि त्यात गायीचे महत्त्व किती आहे हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही.
- ज्या गाई भाकड झाल्या आहेत (दूध देवू शकत नाही अशा) त्या गाई मरेपर्यंत फक्त शेण देतात. त्या गायींना गरीब शेतकरी अतिशय कमी भावात विकून टाकतात. तर त्या गायीच्या शेणापासून तयार झालेल्या गवऱ्याच (शेणी)अग्निहोत्रात वापरत असल्या कारणाने गोहत्या मुळापासून बंद होवू शकते.
- तसेच गायीच्या शुद्ध तुपापासून आणि तांदळापासून अग्निहोत्र होत असल्याकारणाने शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन वाढते.
- त्यामुळे शेतकरी आत्महत्या ही थांबतील +दात घासायची पेस्ट, अंगाला लावायचे साबण, भांडी घासण्याचे साबण, खते, झाडांना घालण्यात येणारी खते यात 90% वाटा बाहेरच्या कंपन्यांचा आहे.
- जर अग्निहोत्र सर्वांनी केलं असता भारताचा रुपया डॉलर च्या तुलनेत मजबूत होण्यास मदत होईल.
त्यामुळे अग्निहोत्र सगळ्यांनी करावे.
|| अग्निहोत्र काळाची गरज ||
रोजच्या वास्तुशुद्धीसाठी आपण झाडू मारणे, फरशी पुसणे, देवपूजा करणे, वार्षिक हवन करतो, व्रतवैकल्य हे सगळे करुन सुध्दा पाहिजे तसा इफेक्ट आपल्या घरात दिसत नाही. उद्देश पूर्ण होताना दिसत नाही. सुख, शांती, यश, धनप्राप्ती याला जर कधी गुणकाराने गुणायचे असेल तर अग्निहोत्र हा एक पर्याय आहे.
वातावरणातल्या सत्त्व, रज, तम लहरी तसेच घरात प्रवेश करणारी नकारात्मक शक्ती स्वयंपाकातून होणारा धूर, टॉयलेट बाथरूममधून येणारी नकारात्मक शक्ती यांना आटोक्यात ठेवायचे काम अग्निहोत्र करत असते. ज्या ठिकाणी संसार आला त्या ठिकाणी या गोष्टी होणारच. तर त्या गोष्टींवर कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला अग्निहोत्र हा रामबाण उपाय आहे.
तसे शास्त्रात अग्निहोत्राचे खूप नियम सांगितलेले आहेत. परंतु कलियुगात विभक्त कुटुंब पद्धती फ्लॅट सिस्टीम नवरा-बायको एक मूल सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अत्यंत धावपळीचे जीवन,व्हॉट्सअप आणि फेसबुक + अग्निहोत्राचे नियम. तर बरेचसे लोक नियम पाहून अग्निहोत्र करण्याचे टाळतात. तर्क बुध्दीने विचार केला असता नियम बाजूला ठेवून अग्निहोत्र करणे गरजेचे आहे…
कालाय तसमै नमः कालानुरूप महत्त्वाचा हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने देश,काल, परिस्थिती, जात, धर्म, पंथ दिवसभरातून मिळणारा वेळ यांचा कशाचाही विचार न करता फक्त अग्निहोत्र करणे हा एकमात्र नियम.
फायदे असंख्य नियम फक्त एकच रोज सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र करणे.
– पंडित जितेंद्र कुलकर्णी गुरुजी