• कार्यालयीन वेळ – सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते रात्री ७ वा.
  • Archives for Q/A

    रत्नांची उत्पत्ती आणि फायदे

    रत्नांची उत्पत्ती ही मुख्यतः भूगर्भात होते. भूगर्भातील लाव्हारस यांची उष्णता, वेगवेगळ्या प्रकारचे स्फटिक, ऑक्सिजन आणि कार्बनडायॉक्साईड भूगर्भात हजारो वर्षांपर्यंत होणारे नैसर्गिक परिणाम त्यामुळे रत्नांना रंग आणि ऊर्जा प्राप्त होते. ही ऊर्जा कुठे आणि कशी वापरायची हे म्हणजे रत्नशास्त्र होय. हे झाले सायइंटिफिक उत्तर परंतु अन्य काही ग्रंथामध्ये अशाही काही कथा आहेत की वामन अवतार विष्णूचा ज्यावेळेस झाला त्यावेळेस बळी राजाला पायाने दाबून पाताळात टाकले होते .त्या बळीराजाच्या शरीराचे अवशेष म्हणजे रत्न होय. हिंदु धर्मामध्ये दागिने, अंगठ्या, पायातली जोडवी, कानातले कवच-कुंडल यांना अनन्य साधारण असे महत्त्व आहे. कारण प्रत्येक देवाच्या हातात, कानात, दागिन्यात रत्न हे असतात कारण फार पूर्वी पासून रत्नांच्या ऊर्जेचा उपयोग नुसता शोभेची वस्तू धारण करणे नसून आयुर्वेदात त्याचे भस्म करून खाण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग आहे .ज्या पद्धतीने शरिरातील 72 हजार नाड्या शरिरातील रक्त इथून तिथे नेण्याचे काम करतात. शरिरातील विशिष्ट जागी दाब दिला असता बाकीचे अवयव चांगल्या पद्धतीने कार्यरत होतात. त्याला आपण अक्युप्रेशर असे म्हणत असतो. जसं हिंदु धर्मात स्त्री आणि पुरुष कान टोचण्याचा विधी करतात. त्याने अधिक तेज आणि बल प्राप्त होते. उदा. पुष्कराज हा रत्न आपण तर्जनीत धारण करतो तर तो तर्जनीतच का हा प्रश्न पडला असता तर्जनी हे मार्गदर्शनकारक बोट आहे. कुणी पत्ता विचारला असता किंवा एखादया व्यक्तीस एखादी गोष्ट दाखवायची असल्यास आपण ती तर्जनीने दाखवितो. म्हणजे तर्जनी हे बोट मार्गदर्शनकारक आहे. गुरुतत्त्व सुद्धा मार्गदर्शनकारक आहे म्हणून दोघांना एकत्र केले असता उत्तम फलित आपणांस मिळत असतात .त्यासाठी चांगल्या पद्धतीचा रत्न उत्तम दर्जाचा योग्य मुहूर्त पत्रिकेतील ग्रहस्थिती आपल्या राशीस्वामीला सूट होणारा पाच ते सहा रत्नांतून निवडून घ्यावा लागतो.रत्न धारण केल्यानंतर महिन्यांतून किमान एकदा त्याला परत सिद्धविध (रिचार्ज) करावा लागतो. त्यासाठी अनुभवी ज्योतिषाची गरज असते.

    – वास्तुशास्त्रतज्ञ, वास्तुविशारद पंडित जितेंद्र कुलकर्णी गुरुजी

    Read more