• कार्यालयीन वेळ – सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते रात्री ७ वा.
 • ज्ञान भंडार

  आपल्या जन्माची तारीख, वेळ,आणि जन्मठिकाण याच्यावरून अक्षांश,रेखांश याच्यावरून आपल्याला जन्मकुंडली ही पंचांगाप्रमाणे मांडता येते आणि त्यानुसार आपल्या आयुष्यात नेमकं काय घडणार आहे याचा अंदाज आपल्याला 100% घेता येतो.

  ज्या व्यक्तीची जन्मवेळ आणि तारीख नाहीये अश्या व्यक्तीने मनात कुतूहलापोटी जो प्रश्न विचारला आहे जाणकार ज्योतिषशास की माझ्या भविष्यात काय आहे किंवा माझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर कोण देईन अश्यावेळेस ज्या वेळी प्रश्न विचारलेला आहे त्या वेळेची कुंडली,त्या स्थानाची कुंडली म्हणजेच प्रश्नकुंडली होय.

  कारण मनात जर इच्छा निर्माण झालेली आहे,विचार आलेला आहे तर तो विचार आधी कुठे तरी होताच म्हणूनच तो मनात विचार आलेला आहे. म्हणून आपल्याला निसर्ग एकप्रकारे मदत करणार आहे या हेतूने आपल्याला प्रश्नकुंडलीत सुद्धा उत्तरं जन्मकुंडलीसारखे मिळू शकतात.

  आजकालच्या जीवनात षोडश संस्कार, सोळा संस्कार जे मानवी हितासाठी शास्त्रामध्ये निर्माण केलेले आहे. त्याच्यातला महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह. तर माझा विवाह कधी होईल याची उत्सुकता प्रत्येक व्यक्तीस लहानपणापासून असते .तर अश्या पद्धतीचा विवाह कसा होईल याचं डिटेल स्वरुपात उत्तर म्हणजे विवाह कधी होईल त्याची तारीख,महिना आणि वर्ष तसेच मिळणारे स्थळ हे फसवणार असेल की सांभाळून घेणारे असेल, कुठल्या दिशेचे असेल, किती किलोमीटर मधले असेल शारीरिक त्यांना काय प्रॉब्लेम असेल, अंदाजे विवाहात किती खर्च होईल, विवाहानंतर घटस्फोट होईल की नाही, मुलगा मुलगी नपुंसक असेल की नाही तसेच विवाहानंतर हे एकत्र राहतील की वेगळे राहतील कुटुंबापासून तसेच मुलगा मुलगी दिसायला कसे असतील, त्यांचे शिक्षण कुठल्या फिल्डमध्ये झालेलं असेल अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला विवाहयोगात मिळत असतात. जन्मकुंडली आणि पुढील वर्ष्याच्या गोचर पत्रिका, महादशा, विदशा अश्या अनेक प्रकारे अभ्यास केला असता आपल्याला विवाहाची निश्चित स्थिती ही जाणून घेता येऊ शकते.

  कुठलीही पूजा शास्त्रीय दृष्ट्या समजावून सांगीतल्या जातात. तसेच कुठल्या विधीच आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्त्व कसं आहे हे आमच्याकडे यजमानांना, भक्तगणांना समजावले जाते .तसेच 450 विद्वान ब्राम्हणांचा ग्रुप आमचा आहे.

  मुंबई, नविमुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात तसेच गुरुजींना स्वतः या क्षेत्रामध्ये 17 वर्षांचा अनुभव आहे .
  गुरुजींचा यजुर्वेद झाल्याकारणाने गुरुजी कुठलीही पूजा उत्तम रित्या समजावून सांगू शकतात.तसेच त्यांच्याकडे असलेल्या ब्राम्हणांचा सुद्धा अतिशय उत्तम अनुभव आहे या क्षेत्रातला. कुठलीही पूजा मुहूर्तावरच करावी असा गुरुजींचा आग्रह असतो.

  वास्तु म्हणजे वास करण्यायोगी जागा, राहण्यासाठी असलेली जागा.

  संसारी मनुष्याला ज्याला प्रगती करायची आहे. गोल साध्य करायचे आहे. त्याने पंचतत्वात निर्माण झालेल्या वास्तूची रचना ही जर वास्तु शास्त्राप्रमाणे केलेली असेल तर निश्चितच त्याच्या प्रयत्नांना लवकर यश प्राप्त होते. आपली वास्तु म्हणजे आपल्या परिवाराचाच एक भाग आहे तसेच आपली वास्तु ही जर कधी समृद्ध वास्तु असेल किंवा त्या ठिकाणी वास्तुशास्त्राप्रमाणे त्या वास्तूची निर्मिती झालेली असेल तर तिथे इच्छित फळं आपल्याला लवकर मिळतात. अशी असंख्य उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर असतीलच. की एखाद्या व्यक्तीने ही वास्तु घेतली आणि त्याठिकाणी त्याची भरभराट झाली. एखाद्याने वास्तु घेतली आणि त्याची अधोगती झाली किंवा तो नुकसानमधे गेला किंवा बरेच लोक असतात त्यांच्या मनात प्रश्न असतो की आम्ही ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो.

  त्या अपार्टमेंटमध्ये तसाच्या तसा फ्लॅट त्याच दिशेचा आमच्या खाली आणि वरती सुद्धा आहे.मग त्यांची भरभराट होते आणि आमची होत नाही किंवा त्यांना प्रॉब्लेम येत नाही. तर वास्तु जरी सेम असेल तरी सुद्धा त्यांचे प्रारब्ध वेगळे आहे,जन्मकुंडली वेगळी आहे, परिवाराचे वातावरण वेगळं आहे त्यामुळे त्यांना मिळणारी फळं ही वेगवेगळी आहेत. त्यामुळे वास्तुपरिक्षणात कुंडली बघून वास्तु सौख्य किती आहे तसेच शुभ अंक कुठला आहे आपल्या वास्तूचा आणि आपला सर्वांचा हे सुद्धा काढणं तितकं गरजेचं असतं. तसेच जमिनीखाली जो पाण्याचा झरा आहे तो जेव्हा जमिनीखाली वाहतो तो एकप्रकारचं घर्षण उत्पन्न करतो. त्या घर्षणातून निर्माण झालेली ऊर्जा म्हणजे जिओपॅथिकट्रेस होय. हा जिओपॅथिकट्रेस जर क्रॉस लाईनीत आपल्या घराच्या मध्यभागी किंवा आपण झोपतो त्या ठिकाणी असेल तर वास्तुशास्त्राप्रमाणे घर असून सुद्धा आपल्याला लाभ होत नाही त्यामुळे त्याचे उपाय जिओट्रेसचे करणं गरजेचं असतं.

  ही पृथ्वी 541 किलोमीटर प्रति तास या वेगाने फिरत आहे. दक्षिणध्रुव आणि उत्तरध्रुव हे मोठे चुंबक आपल्या पृथ्वीला आहेत. तसेच पूर्वेला सूर्यप्रकाश पूर्ण येतो आणि पश्चिमेचा हा निगेटिव्ह प्रकाश मावळायचा असतो. तर पूर्वेचा सूर्यप्रकाश हा अतिशय लाभकारक मानवी जीवनासाठी सांगितलेला आहे. हे सगळं नैसर्गिक त्या त्या वेळी शास्त्रद्यांनी सिद्ध केलेलं आहे. परंतु आपल्या लोकांना किंवा काही लोकांना त्याचा अनुभव आल्याशिवाय त्यांना सत्य वाटत नाही.

  वास्तुशास्त्र हे निसर्गनिर्मित शास्त्र आहे. आपल्या कर्मानुसार, प्रारब्धानुसार आज ना उद्या आपल्याला अशुभ वास्तूची फळं भोगावीच लागतात. दवाखान्यात पैसा जातो, विनाकारण व्यवसायात नुकसान होते, मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही. अख्खा जन्म वाया जातो लोकांचा तरीसुद्धा वास्तुदोष कळत नाही. त्यामुळे निसर्गाने दिलेली ही देणगी ,निसर्गाने दिलेलं हे वरदान त्याच परीक्षण करून वास्तूला आरोग्यदायी बनवायचे आहे आपल्याला आणि सुखासमाधानाने आपल्याला जीवन व्यतीत करायचे आहे.

  रत्न हे भूगर्भात निर्माण झालेले दगड आहेत. परंतु हे अतिशय उपयुक्त आहेत मानवीय हितासाठी. त्यामुळे त्यांना रत्न असे म्हणतात.

  रत्न हे मुळात दगडच आहेत. परंतु ते दिसायला, वापरायला, अनुभवायला खूप फायदेकारक आहेत. म्हणून त्याला आपण जेम्सस्टोन, रत्न, लकीस्टोन, नवग्रह स्टोन, असे म्हणतो

  प्रत्येक ग्रहाचा एक वेगळा खडा आहे. बरेच वर्षे भूगर्भात वेगवेगळ्या पद्धतीचे दगडं लाखो डिग्रीत तापवलेले असतात. लाव्हारसामध्ये तापतात काही समुद्राच्या पाण्यात तयार होतात. बऱ्याच वर्षांचा ऊन, वारा, पाऊस हा त्याच्यावर पडतो. त्यामुळे ते एक ऊर्जास्रोत तयार होतात. भारतात किंवा भारताच्या बाहेर असंख्य प्रकारच्या खाणी आहेत त्याठिकाणी हे स्टोन आपल्याला पाहायला मिळतात त्याची योग्य पारख झाल्यानंतर त्याला फॅक्टरीत कटिंग करायला पाठविले जाते. तिथे कटिंग केल्यानंतर पैलू पाडल्यानंतर ,घासल्यानंतर ते चमकत असतात. आणि असे स्टोन योग्य वेळी ,योग्य मुहूर्तावर,योग्य वजनाचे आणि योग्य बोटात धारण केले असता चमत्कारिक अनुभव आपल्याला पाहायला मिळतात तीन ते चार प्रकारे हे स्टोन काम करतात.
  कसे हे आपण समजून घेऊया.

  सर्वप्रथम आत्ताच सांगितल्याप्रमाणे की ही भूगर्भातील अमूल्य अशी संपत्ती आहे, ऊर्जास्त्रोत आहे. त्यामुळे ते शरीरावर पहायला गेलं तर कुठेही आणि कसंही जरी धारण केले तरी त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होतो. तसेच ऍक्युप्रेशर हे जे काही एक शास्त्र आहे त्या त्या बोटांमध्ये त्या रत्नाने जर कधी योग्य पध्दतीने प्रेशर देऊन ठेवलं आपले विचार बदलत असतात. आणि त्यानुसार आपल्याला फायदा व्हायला सुरुवात होते. दुसरं म्हणजे रत्न अंगठित बनवल्यानंतर त्याला एक अभिषेक पूजा केली जाते.त्याच्या भोवती अवतीभोवती एक प्रकारचे पॉझिटिव्ह वलय तयार होते. ते वलय म्हणजे ओरा आपली सात्विक कामं करत असतो. त्यापद्धतीने आपली कामं होतात.

  तिसरं म्हणजे आपल्या अंतर्मनाला सतत आज्ञा मिळत असते. की आता मी हे रत्न धारण केलेले आहे. त्यामुळे माझं आता कल्याण होणार किंवा माझी ही ही कामे होणार. अशाप्रकारचे एक माईंड सेटमध्ये असतं .

  चौथे म्हणजे ज्याला जो रत्न सुचवलेला आहे सुयोग्य पद्धतीने तो रत्न हातात ठेवल्या ठेवल्या दोन मिनिटांत त्याला फायदा होऊ शकतो. जो रत्न आपल्या बॉडीला सूट झालेला आहे. तो रत्न अक्षरशः व्हायब्रेट करेल.

  रत्न हे काही ग्रहांच्या याच्यानुसार परस्पर विरोधी सुद्धा असतात. त्यामुळे संपूर्ण पत्रिका चेक केल्यानंतरच परस्पर विरोधी ग्रह नसलेले आपल्या राशी स्वामीला शत्रू नसलेला तसेच पत्रिकेमधे तिसऱ्या सहाव्या, आठव्या आणि बाराव्या स्थानाचा मालक ग्रहाचा रत्न कधीही धारण करू नये. काहीवेळेस पत्रिकेमधे कुठलाही स्टोन घालता येणार नाही. अशा सुद्धा पत्रिका असते. त्यावेळेस त्यांनी उपरत्न धारण करावे म्हणजे त्या रत्नांचे मित्रग्रह जे आहेत त्यांचे रत्न धारण करावे. त्यांचे उपरत्न म्हणजे कमी पावरचे जे रत्न असतात ते रत्न धारण करावे. आपआपल्या बजेटप्रमाणे रत्न धारण करावे. प्रयत्नवादी माणसाला नेहमीच रत्न फलदायी ठरतात.

  महिन्यातून दोन वेळेस चतुर्थी येते. एक संकष्टी आणि एक विनायकी आणि जर कधी ती चतुर्थी मंगळवारी आली तर त्याला “अंगारकयोग ” असे म्हणतात. म्हणजे दुग्धशर्करा मिश्रित योग मंगळवार गणपतीचा वार आणि चतुर्थी ही गणपतीची, गणपती तत्त्व त्यावेळेस जास्त असते, त्यामुळे आपण चतुर्थीला जमले नाही. परंतु अंगारकयोग असा महापवित्र योग असल्यास गणपतीचे नामस्मरण, बुद्धिवाढीसाठी गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष, आणि जमल्यास उपवास केल्यास आपल्याला गणपतीची अधिक फलप्राप्ती होत असते, गणपतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो.

  मध्यंतरीच्या काळामध्ये किंवा आताही वट सावित्रीवरून भरपूर जोक तयार होतात, की सात जन्म कसे सांभाळणार एकच जन्म सांभाळता येत नाही. पूर्वी मुलगा मुलगी वयात यायच्या आत म्हणजे 12 ते 14 या वयातच लग्न होत असे. तसेच आताच्या सायन्स म्हणते आहे की आपली त्वचा आणि पूर्ण शरीर हे बारावर्षांनंतर हे पूर्णपणे रिफ्रेश होत असते म्हणजे नवीन प्रमाणात चांगल्या पद्धतीने हे बनत असते, तर बारा गुणिले सात बारा वर्षामध्ये हा प्रकार एक वेळेस होतो. असे सात जन्म आम्हाला एकत्र राहायचे आहे. असे त्या सात जन्माचे लॉजिक आहे.

  आता त्या सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाच्या दारातून परत आणले का नाही या पण, परंतु मधे आपल्याला जायचे नाही.परंतु जर कधी आपल्या आईने सांगितले की हेच तुमचे वडील आहे. तर आपण विश्वास ठेवतो. तशीच आपली हिंदु संस्कृती ही आपली माता आहे आणि माता कधीही आपल्या मुलांचे अहित साध्य करत नाही. त्यामुळे आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्या हिंदू संस्कृतीने आपल्याला सांगितलेले आहे त्यामुळे त्याच्यावर 100℅ विश्वास ठेवावा आणि हे करावे. आजच्या युगामध्ये खरं तर दोघांनीही व्रत एकमेकांसाठी करावे.आज एच आय व्ही सारखे महाभयानक रोग या जगात अस्तित्वात आहेत आणि ही संस्कृती आपण सोडली म्हणूनच हे सगळे रोग आज उत्पन झालेले आहेत.

  एक पत्नीव्रता हे सुद्धा एक प्रकारचे ब्रम्हचर्यच आहे त्यामुळे वटपौर्णिमेच व्रत हे खरं तीन दिवसांचे असते. तर तीन दिवस पती-पत्नींनी एकमेकांना सुदृढ आरोग्य लाभावे यासाठी निसर्गाची म्हणजे वटवृक्षाची ही पूजा आहे.

  एक वटवृक्ष एका आजोबांसारखे आपल्या सगळ्यांचे सांभाळ करतो, त्यामुळे एकप्रकारची निसर्गाची पुजाच आपल्याला सांगितलेली आहे. त्यामुळे वटपूजन हे सर्वांनी आपआपल्या इच्छेने आवश्य करावे

  मनुष्याचे मन आहे त्या स्थितीत समाधानी कधीच नसते, माझ्याकडे काय नाही तेच मला पाहिजे असते. माणुस स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही. तर समोरच्याच्या सुखाने जास्त दुःखी आहे. मला आयुष्यात हे मिळाले नाही मला आयुष्यात ते मिळाले नाही. शिक्षण, धनसंपत्ती, चांगले मित्र, आईवडील किंवा अन्यकुठल्याही गोष्टी ज्या मिळाल्या नाही त्याचाच पाढा आपण सारखा गिरवत असतो. सारखे तेच बोलत असतो परंतु आता काल काय झाले त्याबद्दल आज चर्चा करून उपयोग नाही त्याच्यातून फक्त शिकायचे असते आपल्याला आयुष्यात काही मिळाले नाही किंवा काही कमी मिळाले असे जेव्हा वाटत असेल त्यावेळेस आपण सरकारी दवाखान्यात जावून जे रोगी आहेत त्यांची स्थिती बघावी अनाथ आश्रमात जावून त्या मुलांची स्थिती बघावी. वृद्धाश्रमात जावून त्या वृद्धांची स्थिती बघावी, स्मशानात जावून त्या जळणाऱ्या प्रेताकडे बघावे आणि मग विचार करावा की मी जिवंत आहे आणि दोन वेळा मला जेवण मिळते आणि हे मला समजले आहे ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे.

  हाताची पाचही बोटं सुद्धा सारखी नसतात, तर सर्वांचे आयुष्य कसे सारखे असेल प्रत्येकाला काहीतरी गॉडगिफ्ट मिळालेले आहे ते काय मिळाले आहे त्याचा विचार करावा. आपल्या उद्देशामध्ये, ध्येयामध्ये स्वतःला इतकं झोकून द्यावे की आजूबाजूला काय चाललंय त्याचा विसर आपल्याला पडावा.

  प्रत्येक घरामध्ये कुठे ना कुठे वास्तुदोष हा असतोच.

  आणि आपण बऱ्याच ठिकाणी वाचनामध्ये बघत असतो की आपल्याला समजत असते की या ठिकाणी वास्तुदोष आहे परंतु वास्तुपरिक्षणाची आणि उपाय करण्याची काही लोकांची परिस्थिती नसते किंवा इच्छा नसते ,मग त्या वेळेस काय करावे तर शुद्ध हळदीचे कुंकू घ्यावे त्याच्यामध्ये अर्धा चमचा पंचामृत ,पवित्र यज्ञाची विभूती ही टाकावी, थोडे अष्टगंध, अत्तर टाकावे आणि ज्या ठिकाणी वास्तुदोष आहे त्या ठिकाणी किमान अर्ध्या फुटाचे स्वस्तिक काढावे.

  दर अमावस्या पौर्णिमेला किंवा पंधरा दिवसातून एक वेळेस त्याच्यावर परत अशाच प्रकारचे स्वस्तिक गिरवावे म्हणजे त्यातला काही भाग वास्तुदोषाचा कमी होईल,
  घरामध्ये सुख शांती लाभते.

  ——————————–

  आजकालच्या महागाईच्या युगामध्ये प्रत्येकाला आर्थिक अडचणी ह्या येत असतात कितीही कमवले तरी कमीच पडते दवाखान्यात, शिक्षणात, खाण्या पिण्यात किंवा अन्य कुठल्याही गोष्टींमध्ये हा पैसा चालला जातो आणि समजत नाही पैसा कुठे जातो. इनकम कमी आणि आउट गोइंग जास्त अशी स्थिती होते अशावेळेस घरामध्ये अखंड तुपाचा दिवा लावायचा तो जर कधी पितळेचा किंवा तांब्याचा दिवा असेल तर सर्वात उत्तम त्यामधे लवंग, वेलची, अत्तर दहा रुपयाचा क्वॉईन आणि नॉर्मल थोडेसे हळदकुंकू हे घालावे.

  अखंड तुपाचा दिवा ( 24×7) हा घरात लावावा, ज्याने घरामध्ये अतिशय सात्विक वातावरण तयार होवून धन आकर्षण होण्याचा, धन टिकण्याचा मार्ग हा अखंड स्रोताप्रमाणे सुरू राहतो, अमावस्येला दिवा घासून स्वच्छ करावा आणि ह्या सगळ्या वस्तू टाकलेल्या बदलून टाकाव्या, तसेच मधेच दिवा विझला तरी घाबरण्याचे कारण नाही परत दिवा लावावा, नमस्कार करावा.

  ——————————–

  जर घरात सतत कटकट होत असेल, सतत वादविवाद होत असतील तर तो पितृदोष असू शकतो किंवा अन्य कुठलाही दोष असू शकतो. तर त्याला उत्तम पर्याय म्हणजे घरातील फरशी पुसताना त्यामधे मीठ आणि थोडे अत्तर टाकून फरशी पुसावी, उंबरठा, दरवाजा पुसून घ्यावा. तसेच दर अमावस्येला टॉयलेटच्या खिडकीमध्ये तेलाचा दिवा लावावा. पितरांसाठी अमावस्येला दहीभात, हळदकुंकू हा टेरिसवर ठेवावा, त्याने घरामध्ये काही प्रमाणात शांतता नांदते.

  हिंदूधर्मामध्ये तेहतीस कोटी देवता आहे हा एक चुकीचा गैरसमज आहे.
  तेहतीस कोट खरा हा शब्द आहे, कोटी असा नाही.
  कोट म्हणजे तेहतीस प्रकार तर त्या उच्चतम पातळीला गेलेले ते देवता आहे. आता देवतांची पातळी ठरवणारे आपण कोण आपल्याला एकच तत्त्व ईश्वरीतत्त्व माहिती आहे हे सगळं त्याच तत्वाशी निगडित आहे इतकच आपण लक्षात ठेवावे. तर देवघरामध्ये साधारण पंचायतन मुर्त्या म्हणजे पाच मुर्त्या हव्या आहेत, असे शास्त्रात सांगितलेले आहे परंतु आजच्या धकाधकीच्या युगामध्ये काहीवेळेस या गोष्टी शक्य होत नाही. कारण विभक्त कुटुंबपध्दती आहेत. लोकं देवघर ठेवत आहे घरामध्ये हीच फार मोठी गोष्ट आहे तर दुकानाच्या ठिकाणी शक्यतोवर मुर्त्या ठेवू नये कारण तिथे पूजेचा त्रास होतो म्हणजे पूजा करण्यास जमत नाही काही लोकांना, घरामध्ये भरमसाट देव असावे असेही काही नाही, ज्या तिर्थक्षेत्रावर जातात तिथून लोक देव घेवून येतात ही पण चुकीची गोष्ट आहे. पंचायतन देवता म्हणजे पाच प्रकारच्या देवता गणपती,शिव,विष्णू, कुलदेव,कुलदेवी अशी मुख्य त्याच्यातले प्रकार आहेत. तसेच तळहातापेक्षा मोठ्या मुर्त्या नसाव्या, भरीव मुर्त्या धातूच्या असाव्या, एकच मूर्ती डबल नको, सिंगल मुर्त्या सगळ्या पाहिजे, तसेच रोज तासंतास पूजा करत राहावे कामं सोडून असेही काही नाही. संसारी माणसाने अगदी दोन मिनिटांत देव धुवून ठेवले आणि कुंकू वाहिले, फुलं वाहिली तरी सुद्धा चालतं. रोज करण्याला महत्त्व आहे. काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं, म्हणून पूर्वेच्या भिंतीवर देवघर खाली ठेवावे. बरेच लोकं देवघर वर लटकावून ठेवतात ते चुकीचे आहे किंवा शक्य नसल्यास वायव्य दिशेला ठेवावे देवघराला कलश नसावा.

  जर ईशान्य दिशेस टॉयलेट आले असेल तर घरात कुणालाही डोकेदुखी किंवा नेमकं या स्थितीला काय करावे?
  निर्णयक्षमता कमी असते अशी बरीच उदाहरणे तसेच मुलांची अभ्यासात प्रगती कमी, डोक्यासंबंधी सगळे जे भाग आहेत ते ईशान्येच्या टॉयलेटमुळे असतात. अशा सिच्युएशनला वास्तुपरिक्षण करून घेणे जर कधी शक्य नसेल तर त्या ठिकाणी चंदनाचा स्प्रे मारावा, टॉयलेट दररोज घासावे आणि चंदनाचा स्प्रे मारावा आणि काचेच्या वाटीमध्ये मीठ (अख्खे मीठ)भरून खिडकीत ठेवावे आणि दर पंधरा दिवसांनी ते मीठ बदलावे.

  मी ही चुकू शकतो हा विचार सर्वांनी करावा एखादा जर कधी मत मांडत असेल तर ते सर्वांनी ऐकून घ्यावे आणि नंतर त्याच्यावर प्रतिक्रिया दयाव्या,तसेच लहानांच्या मताला सुद्धा प्राधान्य द्यावे, मोठयांनी किंवा बाकीच्या घरातील लोकांनी आपली मते त्याच्यावर लादू नये. घरातले सर्व छोटे मोठे निर्णय हे सर्वांच्या संमतीनेच व्हावे. कमीत कमी व्हाट्सअप फेसबुकचा उपयोग कमीत कमी व्हावा, संभाषण जास्तीत जास्त घरात असावे,एकत्र बसून जेवावे तसेच कुठलीही गोष्ट घरातल्यांपासून लपवू नये, ती चांगली वाईट काहीही असली तरी सर्वांच्या सर्व गोष्टी माहिती पाहिजे ,घरात सर्वांचे पिनकोड,फोनलॉकचे कोड सर्वांना माहीत पाहिजे कुठेही शक उत्पन्न होईल अशी जागा नसावी. तसेच सर्व डाऊट मनातले त्याच ठिकाणी जागेवर क्लिअर होवून जागेवर क्लिअर करावे त्यानंतर आठवड्यातील एक दिवस आपआपली कामे वाटून घ्यावी कीं बदलून घ्यावी त्याच्याने घरात घरपण टिकून राहते आणि शांतता नांदते.

  सर्वप्रथम सोनं देणारे झाड असेल तरी सुद्धा दरवाजाच्या समोर मध्यभागी कधीही ठेवू नये. संपूर्ण घर हे उध्वस्त होते. तसेच रोज ज्या झाडांना पानं, फुलं, फळं येतात अशी झाडं लावावीत. त्याच्यात प्राधान्य आपल्या नक्षत्र वृक्षांना असते,प्रत्येकाचे एक नक्षत्र असते त्या नक्षत्राचे एक झाड असते ते झाड आपण घराच्या योग्य ठिकाणी खिडकीत लावावे.

  वास्तुशास्त्रानुसार कुठले झाड कुठल्या दिशेला असावे हे ही एक शास्त्र आहे ,याचेही असंख्य उदाहरणे आहेत चुकीच्या दिशेला जर कधी झाड गेले तर चुकीचे परिणाम अनुभवण्यास येतील तसेच काटेरी वृक्ष,वेली ह्या जास्त लावू नयेत. मोठे महावृक्ष हे लावू नयेत. फ्लॅटमधे राहणाऱ्यांनी खिडकीमधे दक्षिण आणि पश्चिम दिशेस जास्तीतजास्त झाडे लावण्याचा प्रयत्न करावा तसेच ज्यांचे घर जमिनीवर आहे त्यांनी थोडे लांब झाडे लावण्याचा प्रयत्न करावा.